गौरव गुरुचा आणि उत्सव मैत्रीचा सोहळा नांदेडमध्ये थाटात संपन्न
नांदेड : किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या सन 1997-98 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी “गौरव गुरुंचा आणि उत्सव मैत्रीचा” या विशेष गुरु-शिष्य भेटीचा कार्यक्रम नांदेड येथील अतिथी हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पाडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्या काळातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेवराव किरकन सर उपस्थित होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलराव लोहकरे, वाय. एस. गंगासागर, शंकरराव मंगनाळीकर, अर्जुनराव घोडके, वसंतराव कांबळे, विठ्ठल गडपाळे, माधवराव वानोळे, डी. आर. होनराव, राम भुसमवार आणि जैउद्दीन इरफान आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. 1997-98 च्या बॅचचे 38 विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते. उपस्थित गुरूजनांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये डॉ. सुरेश गंगासागर आणि शास्त्रज्ञ अंबादास अकुलवाड यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगताना गुरुजनांचा महत्त्वाचा वाटा कसा होता, हे सांगितले. अंबादास अकुलवाड यांचा "1998 स्टार ऑफ द स्टुडन्ट" म्हणून विशेष गौरव करण्यात आला.या वेळी सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या यशस्वी भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. जवळपास 27 वर्षांनंतर विद्यार्थी आणि शिक्षक पुन्हा भेटल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.कार्यक्रमात सदाशिव जाधव व मारोती हनवते यांनी सर्व उपस्थितांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगद माकणे, प्रदीप कांबळे, जगदीप हनवते, सचिन तोटेवाड, राहुल गडपाळे, गजानन कांबळे, दीपा तोटेवाड, सारिका वरवंटे, अनिता मगरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन प्रकाश शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू मुंडे यांनी केले.