वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यूला आलिंगन... बारावीतील अपयशाने १८ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

 वाढदिवसाच्याच दिवशी मृत्यूला आलिंगन... बारावीतील अपयशाने १८ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या!



आमगाव:-नुकतेच सोमवारी१२ वी चा ऑनलाइन निकाल लागला असून त्यात बजरंग चौक आमगाव येथील राहणारा कृष्णा धरम शिवनकर वय वर्ष १८ या विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली मात्र या परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे कृष्णाने आपले राहते घरी आज (७ मई)दुपारी दोन वाजता गळफांस लावून आत्महत्या केल्याचे उघडकिस आले. विशेष म्हणजे आज कृष्णाचा जन्मदिवस होता. आपल्या जन्मदिवशीच कृष्णाने गडफास लावून आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे पाठविन्यात आला असून पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे .

Post a Comment

Previous Post Next Post