ज्येष्ठ पत्रकार राधाकिसन चुटे यांचा भव्य सत्कार; उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबईच्यावतीने पुण्यातील जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या साक्षीने सन्मान सोहळा संपन्न
गोंदिया : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबईच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार राधाकिसन चुटे यांचा भव्य सत्कार पुण्यातील प्रतिष्ठित जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये संपन्न झाला.
या गौरव सोहळ्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आयुष्मान भारत मिशन समितीचे डॉ. ओमप्रकाश शेटे, एबीपी माझा मुंबईच्या संपादिका सरिता कौशिक, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ मुंबईचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि संघटनेचे राज्य समन्वयक इकबाल शेख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या वेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आणि अनेक मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. राधाकिसन चुटे यांच्या पत्रकारितेतील योगदानाची प्रामाणिक दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भव्य आणि सुसज्जरित्या करण्यात आले होते.हा सन्मान म्हणजे डिजिटल माध्यमातील पत्रकारितेला मिळालेली एक नवी ओळख असून, यामुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला.