जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीचा उपक्रम

 जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडीचा उपक्रम



नागपूर (सुमित ठाकरे)

जागतिक फार्मासिस्ट दिन २५ सप्टेंबर २०२५ रोजी भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडी, पूर्व नागपूरच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भाजपा वैद्यकीय आघाडीचे शहराध्यक्ष डॉ. विनोद दाढे यांच्या मार्गदर्शनाखाली या दिवशी आघाडीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


या विशेष दिनानिमित्त रक्तदान शिबिर, फार्मासिस्टांचा सत्कार, “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण मोहीम, एडवांस आरोग्य तपासणी शिबिर आणि “भाजपा फार्मासिस्ट पदग्रहण समारंभ” अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दोनशेपेक्षा जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणी व शिबिराचा लाभ घेतला.

या प्रसंगी श्रीकांतजी दुबे (प्रदेशाध्यक्ष), महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेचे धनंजय जोशी, सोनालीताई पडोळे, हेतल ठक्कर (शहराध्यक्ष), डॉ. हरीश राजगिरे (शहर महामंत्री), शैलेश वैरागडे (शहर महामंत्री), शैलेश अग्रवाल (शहर महामंत्री), मनीष केडिया (शहर मंत्री), राजेंद्र गोतमारे (अध्यक्ष, वाठोडा मंडळ), डॉ. मनीषा राजगिरे, डॉ. धनंजय येरणे, सुधीर दुबे (महामंत्री व पालक), सचिन वानखेडे (महामंत्री) आणि योगेश दिनकरराव भागडकर (अध्यक्ष, भाजपा केमिस्ट फार्मासिस्ट आघाडी, पूर्व नागपूर विधानसभा) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून राबवलेले हे उपक्रम नागरिकांच्या आरोग्य संवर्धनास मोठी चालना देणारे ठरले.

शेवटी योगेश भागडकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत, “भाजपच्या आरोग्य सेवा कार्याला नेहमीच आपला पाठिंबा लाभेल. स्वप्न भाजपाचे – सर्वांच्या स्वस्थ आरोग्याचे!” असे प्रतिपादन केले. या उपक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रातील भाजपच्या योगदानाला बळकटी मिळाली असून फार्मासिस्टांच्या कार्याची समाजमान्यताही अधोरेखित झाली.


Post a Comment

Previous Post Next Post