माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बातमीचा दणका; प्रशासनाला जाग, चार दिवसांपासून पडलेला हायमास्ट खांब अखेर हटवला!

 माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या बातमीचा दणका; प्रशासनाला जाग, चार दिवसांपासून पडलेला हायमास्ट खांब अखेर हटवला!



आमगाव – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात  (दि. ७) सकाळी झालेल्या अपघातानंतर चार दिवसांपासून रोडवर पडून असलेला हायमास्ट लाईटचा खांब अखेर हटवण्यात आला. यामागे मोठं कारण ठरली ती 'माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क' ची सडेतोड पत्रकारिता आणि संतप्त नागरिकांचा आवाज!



चार दिवसांपासून हायमास्ट खांब रस्त्यावरच पडलेला असूनही प्रशासन शांत बसले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या निष्क्रियतेवर माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ने थेट प्रशासनावर बोट ठेऊन बातमी प्रसिद्ध केली – "प्रशासन झोपेत की बेफिकीर खांब कोसळला, जीवाचं काय?" या ठाम मथळ्याखाली बातमी प्रसारित होताच प्रशासन हललं आणि तातडीने घटनास्थळी यंत्रणा दाखल झाली.

मंगळवार (दि. १३) सकाळी नगर परिषद चे कर्मचाऱ्यांनी खांब हटवण्याचे काम सुरू केले. अवजड यंत्रांच्या सहाय्याने पडलेला खांब रोडवरून पूर्णतः हटवण्यात आला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली असून, नागरिकांनी माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चं आभार मानले आहेत.

नागरिकांनी सांगितले की, “जर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवला नसता, तर प्रशासन अजून किती दिवस झोपेत राहिलं असतं कोण जाणे!”




Post a Comment

Previous Post Next Post