UPSC मध्ये गोंदियाचा झेंडा रोवला! तिरोडा-सालेकसाच्या दोन सुपुत्रांची अभूतपूर्व कामगिरी

 गोंदिया जिल्ह्यातील युवकांची UPSC मध्ये घवघवीत कामगिरी



गोंदिया जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिरोडा तालुक्यातील डॉ. पंकज पटले आणि सालेकसा तालुक्यातील सचिन बिसेन यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. डॉ. पटले यांनी देशात ३२९ वा क्रमांक तर सचिन बिसेन यांनी ६८८ वा क्रमांक पटकावला आहे.

ग्रामीण पार्श्वभूमी असूनही जिद्द, कठोर मेहनत आणि अढळ निश्चयाच्या जोरावर या दोघांनी हे यश मिळवले. डॉ. पंकज पटले हे वैद्यकीय क्षेत्रातून प्रशासकीय सेवेकडे वळले असून, त्यांनी अभ्यासात सातत्य राखून यश मिळवलं आहे. तर सचिन बिसेन यांनी सालेकसासारख्या दुर्गम भागातून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून इतर युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

या दोघांची कामगिरी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील नव्या पिढीमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल नवीन उमेद निर्माण होईल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही कामगिरी दीपस्तंभ ठरणारी आहे.

ही यशोगाथा म्हणजे केवळ वैयक्तिक यश नसून, ती संपूर्ण जिल्ह्याच्या क्षमता आणि कर्तृत्वाची साक्ष आहे. गोंदिया जिल्ह्यातील युवकही राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.


Post a Comment

Previous Post Next Post