राज्य आपत्ती प्रतिसाद दल व आपदा मीत्र नागपुर तर्फे साईनाथ विदयालयात एक दिवसीय आपत्ती विषयक कार्यशाळा!
प्रशिक्षण व त्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले!
नागपूर (Disaster Workshop) : राज्य आपत्ती प्रतिसाद दल (State Disaster Response Force) व आपदा मीत्र नागपुरतर्फे (Aapda Mitra Nagpur) साईनाथ विदयालय बोर्डा (Sainath Vidyalaya Board) तहसील पारशिवनी जिल्हा नागपूर येथे दिनांक 07/08/2025 रोजी 250 प्रशिक्षणार्थी यांनी राज्यात तसेच जिल्ह्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्ती या विषयावर गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर अचानक उदभवलेल्या आपत्तीचे निवारण करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना व संरचना, अत्याधुनीक संसाधने, साहीत्यावा वापर व उपयोग, शोध व बचाव कार्य, जनजागृती अभियान, मॉक ड्रील तसेच मेडीकल फर्स्ट रिसपॉन्डर चे कर्तव्य, ईएमएस बाबत माहीती, फर्स्ट एड बाबत माहीती, सीपीआर, एफबीएओ, रेस्क्यु बॉट्स, एफ. डब्ल्यु, आर मध्ये स्टॅण्डर्ड डिवाईस, ईम्प्रावाईज डिवाईस, तसेच बोट व ओबीएम प्रात्याक्षिकासह देवुन संकटावेळेस क्षमतेनुसार, अंत्यंत सहासाने व धैर्याने नैसर्गिक आपत्ती (Natural Disaster) व मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यास मदत कार्य (Relief Work) करणे या बाबत वे व्याख्यानेव्दारे, प्रात्याक्षिकव्दारे, उदा. सह आपत्ती व्यवस्थापनाचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या मार्फतीने प्रशिक्षण (Training) दिले. तसेच त्याचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.
शिक्षक वर्ग प्रामुख्याने उपस्थित!
सदर कार्यशाळा राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे समादेशक श्री बच्चन सिंह (भापोसे) यांचे मार्गदर्शनाखाली व सहायक समादेशक श्री कृष्णा सोनटक्के, यांचे आयोजन व नियोजनामध्ये घेण्यात आली. सदर कार्यशाळेकरिता मुख्याध्यापक श्री विनोद लचोरे सर व उपमुख्याध्यापक श्री राजू बावणकुळे सर, शिक्षक मोहन सावरकर सर, सर्व शिक्षक वर्ग हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर (State Disaster Response Force Nagpur) तर्फे पोलीस उपनिरीक्षक श्री शिवशंकर बोंदर, आपदा मीत्र मास्टर ट्रेनर श्याम मस्के, मनोज मोहने, गौरव तीरोडे, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम क्रमांक 1 मधील रेस्युअर्स HC पाटील, Ncp भोंगाडे, PC. शेलार, PC चव्हाण, PC भोयर, PC चंदनशिवे, DHC मिश्रा, DPC पालुदरकर, PC वानखेडे सहभाग घेतला.